हे वयच असं असतं,
झगडण्याचं,
काहीतरी चांगलं करून दाखवण्याचं,
बाहेरच्या जगात उतरून,
निर्भेळ यश वेचण्याचं.....
हे वयच असं असतं,
आकांक्षा बाळगण्याचं,
सुंदर स्वप्न पाहण्याचं,
या स्वप्नात रंग भरून
ते प्रत्यक्षात उतरवण्याचं.....
हे वयच असं असतं,
धावण्याचं,
धावता-धावता अडखळण्याचं,
आणि नव्या जोमानं कामाला लागण्याचं.....
हे वयच असं असतं,
भरारी मारण्याचं,
उंच उंच झेप घेण्याचं,
उत्तुंग नभाच्या कुशीत,
दिमाखान उडण्याचा आनंद घेण्याचं.....
हे वयच असं असतं,
क्रांती घडवण्याचं,
प्रगती करण्याचं,
जीवनाला आकार देऊन,
आनंदानं जगण्याचं... !!............................ ............काय बरोबर ना ?.
झगडण्याचं,
काहीतरी चांगलं करून दाखवण्याचं,
बाहेरच्या जगात उतरून,
निर्भेळ यश वेचण्याचं.....
हे वयच असं असतं,
आकांक्षा बाळगण्याचं,
सुंदर स्वप्न पाहण्याचं,
या स्वप्नात रंग भरून
ते प्रत्यक्षात उतरवण्याचं.....
हे वयच असं असतं,
धावण्याचं,
धावता-धावता अडखळण्याचं,
आणि नव्या जोमानं कामाला लागण्याचं.....
हे वयच असं असतं,
भरारी मारण्याचं,
उंच उंच झेप घेण्याचं,
उत्तुंग नभाच्या कुशीत,
दिमाखान उडण्याचा आनंद घेण्याचं.....
हे वयच असं असतं,
क्रांती घडवण्याचं,
प्रगती करण्याचं,
जीवनाला आकार देऊन,
आनंदानं जगण्याचं... !!............................
No comments:
Post a Comment